जयंत फाळके - लेख सूची

ऐलतीर–पैलतीर

या लेखात तुम्हाला ‘साठी’ पार केलेल्या पण आजही झेपेल तेवढे काम करणाऱ्या व या कामातून—किंवा विरंगुळ्यातून म्हणा हवे तर—आनंद अनुभवणाऱ्या वृद्धयुवांची ओळख करून देणार आहे. हे वृद्ध युवक किंवा युवावृद्ध ‘विज्ञानवाहिनी’ या संस्थेचे सदस्य आहेत; काही वास्तविक युवक/युवतीसुद्धा विज्ञानवाहिनीत आहेत. या वृद्धांपैकी काही जणांचा तर ‘पैलतीर’ या संकल्पनेवरच विश्वास नाही. काहींचा असेल पण त्यांची मने …

खादी–ग्रामोद्योग–स्वावलंबन संकल्पनासमूह

खादी हा एक स्वीकार्य अर्थव्यवहार असू शकत नाही या विचाराची मोहनींची मांडणी व्यवस्थित आहे. रोजगार केवळ निर्वाहापुरता असला तर ती एक प्रकारची गुलामगिरीच आहे. कमी श्रमांत जास्त उपभोग मिळवण्याची इच्छा, रिकामा वेळ उपलब्ध करून घेणे व त्याचा वैयक्तिक आनंदासाठी (उपभोगासाठी) वापर, कला, विद्या, शास्त्रे यांची आवश्यकता वाटणे–त्यांत रस वाटणे, इत्यादि माणसाच्या प्रवृत्ती नैसर्गिक आहेत हे …

अरवली गाथा (२)

प्रस्तुत लेखकाने फेब्रुवारी महिन्यात, १०-२-२००० पासून १४-२-२००० पर्यंत पाच दिवस तरुण भारत संघाच्या काही कार्यकर्त्यांच्या समवेत ६/८ गावांची भटकंती केली, २०/२५ जोहड, अनिकट इत्यादि पाहिले, जमेल तितक्या मंडळींशी संवाद, चर्चा केल्या आणि जो अनुभव मिळाला तो थोडक्यात असा —- १. फेब्रुवारी २००० मध्ये २०/२५ पैकी फक्त दोन जोहडांमध्ये थोडेसे पाणी होते. बाकी जोहड, अनिकट, बांध …

अरवली गाथा (१)

पाण्याचे दुर्भिक्ष सध्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादि राज्यांमधून भीषण दुष्काळाच्या बातम्या येत आहेत. चांगल्या मॉन्सूनच्या सलग बारा वर्षांनंतर केव्हातरी, कुठेतरी असे काही होणारच आहे ही आपली धारणा आहे. राजस्थानातल्या “अलवर” जिल्ह्यातील “ठाणागाझी’ तहसील आणि त्याच्या आसपासच्या काही भागाची ही कहाणी! अरवलीच्या टेकड्यांमधील पाचसहा छोट्या छोट्या नद्यांच्या पाणलोटात वसलेला हा भाग! “अर्वरी’, “सरसा”, “तिलदेही”, “जहाजवाली” आणि …